नायलॉन, काचकट मांजा विक्री; कारवाईसाठी पोलिस अॅक्शन मोडवर

Foto
 मांजा विक्रीची गोपनीय माहिती देणाऱ्याला मिळणार पोलीसांकडून बक्षीस

वैजापूर, (प्रतिनिधी) _:  मकरसंक्रांती उत्सवात पतंगबाजीत नायलॉन मांजा मानवासह पक्षांना जीवघेणा ठरला आहे. अपायकारक व कायद्याने बंदी असलेल्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी वैजापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले अॅक्शन मोड मध्ये आले आहेत.

वैजापूर ठाणे हद्दीत कुठेही नायलॉन मांजा तयार करुन किंवा बाहेरगावाहून आणून विक्री करत असेल तर त्याविरुध्द कड़क कारवाई करण्याचा कडक इशारा त्यांनी दिला आहे. विशेषतः पोलीसा पर्यंत मांजा विक्री करणाऱ्या व्यक्तींचे नाव पत्ता गुप्त स्वरूपात कळवल्यास पोलीसाकडून खबर देणाऱ्या व्यक्तींचे नाव गुप्त ठेऊन त्याला पोलीसांना मदत केल्याबद्दल बक्षीस देण्याचे वैजापूर पोलिसांनी जाहीर केले आहे.


शहरात दरवर्षी पतंग उडवितांना वापरला जाणाऱ्या पारंपरिक दोऱ्याची जागा आता नायलॉन मांजाने घेतली आहे. घडत असतात शहर व परिसरात शांतता, सुरक्षितता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी घातक नायलॉन मांजा, काचकट मांजा तसेच जीवितास धोका निर्माण करणाऱ्या प्रतिबंधित मांजाची विक्री खरेदी रोखण्यासाठी वैजापूर पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे.

हा मांजा अतिशय घातक असून माणसाचा गळा चिरून मृत्यू होणाऱ्यांची भली मोठी संख्या पाहता त्या काचकट मांजाच्या खरेदी विक्रीवर न्यायालयाने पुर्णपणे बंदी घातली आहे. असे असतानाही सर्रासपणे हा मांजा वापरणाऱ्यांची संख्या कमी नाही. वैजापूरात मांजाने गळा कापण्याच्या घटना या सातत्याने
त्यानुसार शहरात कुठेही नायलॉन मांजा, काचकट मांजा विक्री किंवा साठा केल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी ती माहिती तात्काळ पोलिसांना डायल ११२ तसेच ८९७५३७२७२७या भ्रमणध्वनीवर कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच यावेळी त्यांनी स्पष्ट केले.  की, माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव व ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल त्याचबरोबर उपयुक्त माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाणार असल्याचे वैजापूर पोलिसांकडून जाहीर केले आहे.


सणांचा रंग उत्साहाचा असू द्या, रक्ताचा नाही. पक्षी, प्राणी आणि नागरिकांच्या जीविताला धोका पोहोचविणारा मांजा वापरू नका. सुरक्षित, कायदेशीर मांजाच वापरा नायलॉन मांजाचा वापर करताना आढळून आल्यास त्याविरुध्द पोलीसांकडून कडक कारवाई केली जाईल.
- सत्यजीत ताईतवाले
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैजापूर पोलीस ठाणे

वैजापूर शहरात सातत्याने घातक मांजाच्या वापराने गळा कापून जखमी होण्याच्या घटना वारंवार होत आहे. वैजापूर पोलिस ठाण्याच्या वतीने माजांच्या वापराबाबत केलेले आवाहन स्वागतार्ह आहे. त्याचबरोबर अनोळखी व्यक्तींनी मांजाच्या साठवणूकीसंदर्भात दिलेल्या माहितीनुसार संबंधित मांजा विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे.
- डॉ. आबासाहेब कसबे, सामाजिक कार्यकर्ते